Breaking News

गव्हाणमध्ये गुरुकुल पालक मेळावा

गव्हाण : रामप्रहर वृत्त

येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्यु. कॉलेजमध्ये इयत्ता 5 वी ते 10 वीमधील विद्यार्थ्यांच्या पालकांचा  गुरुकुल पालक मेळावा बुधवारी (दि. 24) झाला. स्थानिक शाळा समितीचे चेअरमन तथा संस्थेच्या जनरल बॉडी व समन्वय समितीचे सदस्य अरुणशेठ भगत हे अध्यक्षस्थानी होते.

विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे यांनी मान्यवरांचे व पालकांचे स्वागत केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नूतन गुरुकुल प्रमुख संदीप भोईर यांनी गुरुकुल विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांची माहिती दिली. माजी गुरुकुल प्रमुख रवींद्र भोईर यांनी आपल्या ओजस्वी भाषेत विद्यालयाच्या गुरुकुल विभागाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. विद्यालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी मोफत वेष्टनांचे वितरण करण्यात आले.या वेळी स्थानिक शाळा समितीचे सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, गव्हाण ग्रा.पं. सदस्य विजय घरत, कामिनी कोळी, अजय भगत, चिंतामण गोंधळी, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक तथा संस्थेचे ‘लाइफ वर्कर’ अरुण घाग, रयत को-ऑप. बँकेचे संचालक तथा संस्थेचे ‘लाइफ वर्कर’ प्रमोद कोळी, अटल टिंकरिंग प्रयोगशाळा प्रमुख रवींद्र भोईर, सर्व सेवक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योत्स्ना ठाकूर यांनी केले, तर प्रमोद कोळी यांनी आभार मानले.

Check Also

नतनोत्सवाने पनवेलमध्ये रंगला कलेचा सुरेल जल्लोष

नगरसेवक परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तसांस्कृतिक कलेचा वारसा जपणाऱ्या नृत्यार्पण फाईन …

Leave a Reply