कर्जत : प्रतिनिधी
नवी मुंबईतील जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने कर्जत तालुक्यातील टेंभरे येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेणार्या आदिवासी आणि गरजू मुलांना क्रीडा गणवेश व स्पोर्ट शूजचे वितरण करण्यात आले. आपली संपूर्ण शाळा डिजिटल करण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते विनय म्हात्रे यांनी या वेळी सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक कोळी यांनी प्रास्ताविक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत केल्याबद्दल माजी सरपंच हरेश घुडे यांनी जनसेवा मित्र मंडळाचे कौतुक केले. स्थानिक कार्यकर्ते देशमुख आणि संतोष निलधे यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला कांचन म्हात्रे, स्थानिक कार्यकर्ते कैलाश निलघे, अशोक जाधव, शाळेतील शिक्षक संकपाळ, गहीने, सुडके यांच्यासह जनसेवा मित्र मंडळाचे कार्यकर्त, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
टायगर ग्रुपच्या वतीने शालेय साहित्यवाटप
कर्जत ़: बातमीदार
टायगर ग्रुपच्या कर्जत विभागाकडून तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वृक्षारोपणही करण्यात आले.
टायगर ग्रुपचे अध्यक्ष पैलवान तानजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यातील काळ्याचीवाडी, गुढवणवाडी आणि लोभ्याचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे आणि खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यात वृक्षारोपणही करण्यात आले. या वेळी ग्रुपचे तालुकाध्यक्ष रवींद्र डायरे, धनंजय धुळे, सुभाष काळण, गणेश शेळके, नितीन डायरे, मदन डायरे, महेश पेमारे, चंद्रकांत निरगुडा, नरेश डायरे, समीर कडव, जितेंद्र म्हसे, निवास डायरे, रवींद्र पेमारे, विशाल ठाकरे यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
घोसाळे विद्यालयात दप्तरवाटप
रोहे ः प्रतिनिधी
कोएसोच्या घोसाळे येथील माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शिवसेना विभागप्रमुख सचिन फुलारे यांच्या पुढाकाराने दप्तरवाटप करण्यात आले, तसेच फुलारे यांनी 10 विद्यार्थ्यांची शालेय फी भरली आहे. या वेळी सचिन फुलारे यांच्यासह धाटाव विभागप्रमुख नितीन वारंगे, विद्यालयाचे चेअरमन प्रकाश धुमाळ, तुकाराम गांगल, रणजीत कदम, आशिष सावंत, विनायक गायकर, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.