Breaking News

रोटरॅक्टतर्फे पनवेल महापालिकेला फेस मास्क

पनवेल ः वार्ताहर

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल एलिटने पनवेल महानगरपालिकेला फेस मास्क प्रदान केले. मनोज मुनोत आणि मनीष मुनोत यांनी फेस मास्क प्रायोजित केले होते. पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. आयुक्तांनी याबद्दल पॅरंट क्लबचे अध्यक्ष रितेश मुनोत आणि भाविन जैन यांचे आभार मानले. योगदानासाठी आपण आमच्या सोशल मीडिया हँडलवर आमच्याशी संपर्क साधू शकता. अगदी लहान देणगीदेखील मोठा बदल घडवून आणू शकते, असे आवाहन रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल एलिटतर्फे करण्यात आले आहे.

रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे गरजूंना मदतीचा हात

मुरूड ः प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन काळात मुरूड तालुक्यातील 66 गावांसह 10 आदिवासी वाड्यांवर प्रत्यक्ष पाहणी करून गरजू कुटुंबीयांना राष्ट्रीय स्वयंसेवक जनकल्याण समितीतर्फे जीवनावश्यक वस्तूंच्या 689 किट्सचे वाटप करण्यात आले. याबाबतची माहिती रा. स्व. संघ जनकल्याण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष मनीष प्रधान यांनी दिली. वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये डाळ, तेल, कडधान्य, हळद, मसाला, कांदे-बटाटे, साबण आदींचा समावेश आहे. जनकल्याण समितीच्या युवा टीममध्ये मनीष प्रधान यांच्यासह तालुका संघचालक दिलीप जोशी, प्रमोद उपाध्ये, सुरेश वर्तक, मंदार पेंडसे, संजय ठाकूर, राजीव सिंह आदींतर्फे वाड्या-वस्त्यांवर जाऊन कोरोनावर मात करण्यासाठी नागरिकांना धैर्य राखण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Check Also

खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …

Leave a Reply