Breaking News

‘50 आमदार संपर्कात’

मुंबई ः प्रतिनिधी

शरद पवारांनी भाजपवर आरोप करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, की आपले नेते पक्ष का सोडून जात आहेत. आम्ही कुणालाही धमकावलेले नाही किंवा कोणावरही दबाव आणलेला नाही, असे गिरीश महाजन यांनी सांगितले. 

विरोधी पक्षातील म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीतील जवळपास 50 आमदार, नेते भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोटही गिरीश महाजन यांनी केला आहे. चित्रा वाघ यांच्याशी महिनाभरापूर्वीच बोलणे झाले होते. राष्ट्रवादीत भवितव्य राहिले नसल्याचे त्यांनी सांगितले होते, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली. हसन मुश्रीफ यांच्यावरील कारवाई कायद्यानुसार सुरु आहे. सूडबुद्धीने कारवाई करायची असती, तर सुनील तटकरे, अजित पवारांवरही कारवाई केली असती. पण आम्ही नियमानुसार कारवाई केली. ईडी, सीबीआय चौकशीमध्ये मुख्यमंत्री कुठलाही हस्तक्षेप करत नाहीत, असेही ते म्हणाले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply