पनवेल ः रामप्रहर वृत्त
कामगारांच्या हितासाठी सदैव कार्यरत असलेल्या भारतीय मजदूर संघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी उरण येथील कामगार नेते सुरेश पाटील यांची निवड झाली आहे.
भारतीय पोर्ट अॅण्ड डॉक मजदूर महासंघाची दोन दिवसीय बैठक नुकतीच कोचीन (केरळ) येथे पार पडली. या बैठकीत सुरेश पाटील यांच्या नावाची घोषणा सर्वानुमते करण्यात आली. या बैठकीस महासंघाचे अध्यक्ष अॅड. भवानीशंकर, जनरल सेक्रेटरी व्यंकय्या नाईक, माजी अध्यक्ष प्रभाकर उपरकर, कामगार नेते सुधीर घरत, जेएनपीटीचे विश्वस्त रवी पाटील, कोचीन पोर्टच्या अध्यक्षा पद्मजा, तसेच सर्व बंदरांचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
भारतीय मजदूर संघ रायगड जिल्हाध्यक्ष व जेएनपीटी जनरल कामगार संघटना अध्यक्ष असलेले सुरेश पाटील हे गेल्या 30 वर्षांपासून कामगार क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. कामगारांसाठी ते जेलमध्येही गेले आहेत, कामगारांसाठी सातत्याने त्यांनी आवाज उठविला आहे, त्यामुळे त्यांना लढाऊ कामगार नेता म्हणून ओळखले जाते. त्यांच्याकडे असलेलला जनसंपर्क व अनुभवामुळे त्यांच्यावर राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.