Breaking News

महाडमध्ये हुतात्मा दिनी शहिदांना अभिवादन

महाड ः प्रतिनिधी

क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानच्या वतीने शहीद हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी (दि. 10) महाडच्या हुतात्मा दिनी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. थोर स्वातंत्र्यसेनानी नानासाहेब पुरोहित यांच्यामुळे महाडमध्ये देशाच्या समग्र स्वातंत्र्यलढ्याची पहिली ठिणगी पडली. त्या अनुषंगाने महाडमध्ये क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या प्रतिष्ठानमार्फत 78 वर्षांपूर्वी महाडची मामलेदार कचेरी ताब्यात घेण्यासाठी नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या किसान मोर्चात शहीद झालेल्या पाच हुतात्म्यांच्या स्मरणार्थ त्यांना वंदन करून श्रध्दांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष रोहित पाटील यांच्या हस्ते प्रतिष्ठानचे कार्यालय येथे नानासाहेब पुरोहित यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर शिवाजी चौक येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपतींना मानवंदना अर्पण करून शहीद क्रांतिपुत्रांना अभिवादन करीत त्यांच्या आहुतीस्थळी जाऊन क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोहित पाटील, निरज चौधरी, प्रदीप लोते, सचिन वडके तसेच सेवानिवृत्त बीडीओ रमेश गुजर आदी सदस्यांनी हुतात्मा नथू टेकावला, अर्जुन भोई, वसंत दाते आणि कमलाकर दांडेकर यांच्या नामफलकांना पुष्पमाला अर्पण केली. शिवाजी चौक येथून निघालेल्या या छोटेखानी रॅलीची चवदार तळे येथे सांगता झाली.

Check Also

उत्तर रायगड भाजपमध्ये संघटनात्मक नियुक्त्यांची घोषणा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्ह्यांतर्गत मंडळ, विविध मोर्चे, आघाडी आणि सेलच्या …

Leave a Reply