Breaking News

बेलोशी येथे वृक्षारोपण

रेवदंडा : प्रतिनिधी – कुलस्वामिनी नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने रविवारी (दि. 28)  बेलोशी ग्रामपंचायत हद्दीत ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी गावातील प्राथमिक शाळा, हायस्कूल, बेलोशी ते वावे रस्ता आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष राकेश भोपी यांनी प्रास्ताविकात वृक्षारोपणाचा हेतू विषद केला.

सरपंच कृष्णा भोपी, ग्रामपंचायत सदस्य भास्कर भोपी, हायस्कूलचे माजी चेअरमन दत्तात्रेय भोपी,  राजिप शाळा कमिटी अध्यक्ष नरेश ठाकूर, व्दारकानाथ गुंड, दत्तात्रेय वालेकर, मधुकर म्हात्रे, नागेश वारगे, मंडळाचे सचिव ओमकार ठाकूर, खजिनदार सुमिती निरकर, धनंजय भोपी, धिरज भोपी यांच्यासह मंडळाचे  सदस्य व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी कुलस्वामिनी नवतरुण मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनीं विशेष परिश्रम घेतले.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply