Breaking News

मुरूडमध्ये मतदार नोंदणी जनजागृती शिबिर

मुरूड : प्रतिनिधी

येथील अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्स, येथे तहसीलदार कार्यालय निवडणूक शाखा व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष संक्षिप्त प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणी जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 18 वर्ष पूर्ण झाले आहे त्यांनी नोंदणी करणे, प्रभाग रचनेत नावांची अदलाबदल करणे, मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे कमी करणे आदी प्रकारची माहिती या शिबिरात देण्यात आली.

तहसीलदार परीक्षित पाटील, नायब तहसीलदार प्रज्ञा काकडे, वनिता म्हात्रे, निवडणूक शाखेचे संतोष पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अंजुमन इस्लाम जंजिराचे अध्यक्ष इरफान शाह, सेक्रेटरी अरशद नजीरी, सहसेक्रेटरी अब्दुल रहीम कबले, प्रायमरी स्कूल चेअरमन हाफिज कबले, तुफेल दामाद आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. तरुणांची मोठ्या प्रमाणात मतदार म्हणून नोंदणी व्हावी व मतदानामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, या हेतूने प्राचार्य डॉ. शरद फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. साजिद शेख व प्रा. सोनाली पवार, तसेच चिन्मय पेटकर, हूझेफा घलटे, विनायक पाटील, जयदीप नाईक, निदा गोरमे, सफा दरोगे, सोनल पाटील आदी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शासनाच्या निवडणूक प्रक्रियेत युवकांचा सहभाग असला पाहिजे. लोकांमध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक आहे. नवीन मतदार शोधून त्याची नोंदणी होण्यासाठी युवकांनी सहभाग दाखवावा.

-परीक्षित पाटील, तहसीलदार, मुरूड

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply