नवी मुंबई : सिडको वृत्त
सिडकोतर्फे दुकाने, गाळे व कार्यालय यांची विक्री पारदर्शक व जलद पद्धतीने व्हावी याकरिता ई-लिलाव प्रणालीचा अवलंब करण्यात आला आहे. ई-निविदा व ई-लिलाव पद्धतीचा अवलंब करण्याकरिता सिडकोतर्फे पात्र बोलीदार, बँकांकडून निविदा मागविण्यात आल्या होत्या. या प्रक्रियेदरम्यान एचडीएफसी बँक यशस्वी झाली होती. नवी मुंबईतील सानपाडा, जुईनगर, नेरूळ व बेलापूर रेल्वे स्टेशन संकुलामधील कार्यालयाच्या विक्रीकरिता सदर ई-निविदा व ई-लिलाव प्रणाली अंतर्गत दि. 10 जून 2019 रोजी व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते उद्घाटन करून योजना कार्यान्वित करण्यात आली होती. सदर योजनेस मिळालेला प्रतिसाद व यश पाहता, यापुढील दुकाने व कार्यालयांची विक्री ई-लिलाव पद्धतीनेच करण्याचा सिडकोचा मानस आहे.
ई-निविदा व ई-लिलाव पद्धतीमुळे सिडकोतर्फे जाहीर करण्यात येणार्या योजनांची व्याप्ती वाढून त्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचणार आहेत. याकरिता सिडको महामंडळाच्या ुुु.लळवले.िीेर्लीीश247.लेा या संकेतस्थळावर इच्छुकांना नोंदणी, अर्ज स्वीकारणे, कागदपत्रे अपलोड करणे, अनामत रक्कम भरणे इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार्या इच्छुकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण प्रक्रिया गुपीत राहण्याची हमी देऊन योजना दिलेल्या वेळापत्रकानुसार राबविण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया दि. 31 जुलै रोजी झाली.
बोली लावते वेळी जर शेवटच्या क्षणी एखाद्या बोलीधारकांनी बोली लावली, तर बोलीप्रक्रियेस पाच मिनिटांची वेळ वाढवून देण्यात आली होती. जेणेकरून सर्व बोलीधारकांस बोली लावण्यास समान संधी उपलब्ध होऊ शकली. यामधील प्रत्येक कार्यालयाकरिता ई-लिलावात निविदाधारकांनी लावलेली उच्चतम बोली व त्यानंतर गुप्त ई-निविदा उघडून यामधील उच्चतम बोली यांच्यातील तुलना करून सर्वाधिक बोलीधारकास यशस्वी अर्जदार म्हणून घोषित करण्यात आले आहे. रेल्वे संकुलातील ई-लिलाव प्रक्रिया अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली असून, संपूर्ण यादी सिडको महामंडळाच्या ुुु.लळवले.िीेर्लीीश247.लेा व ुुु.लळवले.ारहरीरीहीींर.र्सेीं.ळप या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.