उरण : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या द्रोणगिरी नोड येथील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विद्यालयात शुक्रवारी (दि. 1) तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष सायली म्हात्रे, जि. प. सदस्य विजय भोईर, दीपक ठाकूर, विस्तार अधिकारी प्रियंका पाटील, के. पी. म्हात्रे, बीसीटी विद्यालयाचे चेअरमन प्रतिनिधी चंद्रकांत घरत, जसखार केंद्र प्रमुख टी. जी. म्हात्रे, विद्यालयाच्या कमिटीचे सदस्य सुरेश पाटील, सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनुराधा काठेे व इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
या वेळी खेळाडूंनी स्पर्धा खिलाडूवृत्तीने व प्रामाणिकपणे पार पाडण्याची शपथ घेतली. 14 शाळा व 37 वेगवेगळ्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. शनिवारी (दि. 3) मुलींची कबड्डी स्पर्धा होणार आहे.