कर्जत : प्रतिनिधी
युनायटेड वे मुंबई या संस्थेमार्फत कर्जत शहरातील आमराई रिक्षा स्टँड येथे कोरोना लसीकरण व मास्क लावण्याचे फायदे काय होऊ शकतात, याविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
युनायटेड वे मुंबईच्या रेखा जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व लसीकरणाचे फायदे आणि काळजी कशी घ्यावी हे पटवून दिले. कर्जत पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीपान सोनवणे यांनी आपल्या भाषणात सगळ्या चालकांनी काय उपाय योजना केल्या पाहिजेत व आपली व आपल्या सोबत असणार्या प्रवाशांची कशी काळजी घेतली पाहिजे या विषयी माहिती दिली. संस्थेचे खंडू मंजुळे, अपेक्षा देशमुख, पोलीस हवालदार प्रशांत देशमुख, पोलीस शिपाई भरत पावरा यांच्यासह कर्जत आमराई रिक्षा स्टँडचे अध्यक्ष व सर्व रिक्षा चालक, मालक या वेळी उपस्थित होते.