Breaking News

रवींद्र भोईर यांना आदर्श गुरुकुल पुरस्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सन 2018-19 शैक्षणिक वर्षामध्ये रयत शिक्षण संस्था, सातारा संचलित कर्मवीर विद्याप्रबोधिनीमार्फत आदर्श गुरुकुलप्रमुख पुरस्कार श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेज, गव्हाण विद्यालयाचे उपशिक्षक रवींद्र भोईर यांना नुकताच समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर रवींद्र भोईर यांनी रयत शिक्षण संस्थेचे मनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तसेच रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व समन्वय समिती सदस्य, विद्यालयाचे चेअरमन अरुणशेठ भगत यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी प्राचार्या  सौ. डोईफोडे, पर्यवेक्षक भर्नुके, विन्हेरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. घाग, रयत बँकेचे संचालक प्रमोद कोळी, ग्रंथपाल महेश म्हात्रे आदि उपस्थित होते.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply