शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीतील शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनभावना जाणून घेत समाजाप्रति प्रामाणिकपणे काम करणारे भाजप नेते महेश बालदी यांच्या रूपाने उरण विधानसभा मतदारसंघात विकासाचे युग येणार आहे. त्याचे साक्षीदार होण्यासाठी मोहोपाडा येथे शुक्रवारी (दि. 9) झालेल्या कार्यक्रमात शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी क्रांतिदिनाचे औचित्य साधून भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.
जनता विद्यालय सभामंडपात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला.
या सोहळ्यास माजी आमदार देवेंद्र साटम, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, ज्येष्ठ नेते विजय शिरढोणकर, पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे विस्तारक अविनाश कोळी, पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी सिडको अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना मोबाइलवरून 8980808080 या नंबरवर डायल करा, असे सांगताच त्यांनी लागलीच नंबर डायल करून भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.
या वेळी शेकापतून डॅशिंग युवा नेते व कसळखंड ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, सरपंच माधुरी अनिल पाटील, उपसरपंच रोहित घरत, पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर बडे, शेकापचे ज्येष्ठ नेते वासुशेठ मांडवकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पवार, टेंभरीचे माजी सरपंच भरत म्हात्रे, ज्ञानेश्वर मुंढे, विलास पाटील, वासांबे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमित मांडे, वाशी ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच जया पाटील, माजी सरपंच काका गायकवाड, सावळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दत्तात्रेय म्हसकर, राजेश भंडारकर, प्रथमेश मालुसरे, बारवाई ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जगन्नाथ पाटील, लक्ष्मण पाटील, महादू पाटील, केतन पाटील, रोमित आत्माराम पाटील, अॅड. उमेश पवार, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर भोईर, कासप ग्रामपंचायतीचे सदस्य योगेश पाटील, सावळे ग्रामपंचायतीच्या सदस्य छाया दिलीप केदारी, कसळखंड ग्रामपंचायतीच्या सदस्य रंजना राम नाईक, टेंभरी ग्रामपंचायतीचे सदस्य सजन्या वाघ, जयराम पवार, तुराडे ग्रामपंचायतीचे सदस्य भाऊ ठाकूर, गुळसुंदे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य महादू दोरे, माजी सरपंच रुख्मिणी गायकवाड, सदस्य नंदीनी आटपाडकर, प्रभाकर जांभुळकर, ज्ञानेश्वर मुंढे, जनार्दन महाडिक, ज्ञानेश्वर भोईर, प्रशांत तांबोळी, बबन पवार, नितीन पवार, जनार्दन मुंढे, लक्ष्मण जांभळे, जयेश जांभळे, गणेश जांभळे, अनंता म्हात्रे, महेंद्र म्हात्रे, संतोष गावडे, शहाजी चलाट, संतोष पाटील, गणेश पाटील, राम गाताडे, राजेश कांबळे, राजू चव्हाण, रोशन सोनावळे, भीम पवार, विजय म्हस्के, बाळकृष्ण क्रीडावकर, राजेश कारंडे, जगदिश दाभणे, गुरव समाज अध्यक्ष अमोल गुरव, आंबिबाई दोरे, अंबिका यादव आदींसह उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बाराशेहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचे नेतृत्व स्वीकारले.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले की, आपला लोकप्रतिनिधी हा आपल्यासाठी काम करणारा प्रतिनिधी असावा. तशाच प्रकारे नागरिकांच्या गरजा काय आहेत हे जाणून महेश बालदी जनतेपर्यंत पोहचत आहेत. त्यांनी भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असून, खर्या अर्थाने आपल्या कामातून ओळख निर्माण केली आहे. त्यांचे सर्वांशी असणारे संबंध हे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत. त्यामुळे येणार्या ऑक्टोबर महिन्यात चांगला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना साथ द्या.
भाजप नेते महेश बालदी यांनी सांगितले की, घारापुरीपर्यंत वीज पुरविण्याचे काम भाजपने केले. महाराष्ट्रात पहिले शिवसमर्थ स्मारक जेएनपीटीकडून बांधून घेतले. मच्छीमार बांधवांकरिता करंजा जेट्टीचे नूतनीकरण, उरणमध्ये गॅस पाइपलाइन, सीएनजी पंप अशी 500 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची विकासकामे आपण केली आहेत. रसायनीत औद्योगिक क्षेत्र असतानाही उरण विधानसभा मतदारसंघातील आमदारांना त्याचा फायदा येथील नागरिकांसाठी करून देता आला नाही. येथे जांभिवली, चावणे धरण आहे. या धरणाच्या माध्यमातून येथील नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्याचे काम होऊ शकले असते, पण उरणच्या विद्यमान आमदारांकडे राजकीय इच्छाशक्ती नाही. म्हणूनच रसायनी परिसराचा विकास होऊ शकला नाही. या परिसरात एचपीसीएल व बीपीसीएल यांच्या सीएसआर फंडातून रसायनीत अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय व ट्रामा सेंटर बांधून घेऊ, कोन-सावळा रस्त्याचे काँक्रीटीकरण करून दाखविणार, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, आम्ही सर्वधर्मसमभाव ही भावना हृदयात कोरून ठेवून काम करीत असून, कधीही जाती-धर्माचे राजकारण केले नाही. सर्व समाजाचा विकास हाच आमचा लोकहिताचा उद्देश आहे. त्यामुळे विरोधकांनी जातीचे राजकारण करू नये. उरण विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी निवडणूक लढविणार आहे आणि मी तुम्हाला आश्वासनांचे स्वप्न दाखवत नाही, तर ते प्रत्यक्षात उतरविणार आहे. रसायनीत पुन्हा सोन्याचा धूर निघेल हे माझे वचन आहे.
माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे यांनी रसायनी परिसराची माहिती देत या परिसराला सुसज्ज हॉस्पिटलची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली. मोहोपाडा ग्रामपंचायतीची लोकसंख्या पाहता येथे नगरपंचायतीची गरज असल्याचेही गाताडे यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार विभागीय अध्यक्ष किरण माळी यांनी मानले.
महेश बालदी काम करणारा नेता : ना. रवींद्र चव्हाण
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्यांचे स्वागत केले. भाजपवर विश्वास ठेवून जो प्रवेश केला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, या भागात 500 कोटींपेक्षा जास्त कामे महेश बालदी आणि त्यांच्या सहकार्यांनी केली. खर्या अर्थाने बालदी यांची विकासकामे करणारा नेता म्हणून ओळख निर्माण झाली आहे.
लोहचुंबकाप्रमाणे कार्यकर्ते भाजपकडे आकर्षित : लोकनेते रामशेठ ठाकूर
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीला असणार्या गर्दीप्रमाणे पक्षप्रवेश होत आहेत. लोहचुंबकाप्रमाणे कार्यकर्ते भाजपकडे आकर्षित होत आहेत. जगात पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेबांनी देशाला नाव मिळवून दिले आहे. आपल्या भागात काम करण्याची ताकद महेश बालदी यांच्यामध्ये आहे. त्यामुळे उरणमध्ये त्यांना यश मिळेल, असा विश्वासही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.