Breaking News

प. महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43

पुणे : प्रतिनिधी

कोल्हापूर आणि सांगलीत आणखी तीन मृतदेह सापडल्याने पश्चिम महाराष्ट्रातील पूरबळींची संख्या 43वर पोहोचली असून, अद्यापही तीन जण बेपत्ता आहेत, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी सोमवारी (दि. 12) पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत चार लाख 74 हजार 226 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले असून, पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारने तातडीची पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही रोख रक्कम उद्याच पूरग्रस्तांपर्यंत पोहोचेल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पुणे-बंगळुरू या राष्ट्रीय महामार्गावर अखेर आठ दिवसांनंतर कोल्हापूर-शिरोली अशी अवजड वाहतूक सुरू करण्यात आली.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply