Breaking News

कशेडी घाटात टँकरमधून वायूगळती

पोलादपूर : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी गावाजवळ सोमवारी रात्री एक टँकर खचलेल्या मोरीमध्ये अडकून त्यातून वायूगळती झाली. त्यामुळे कशेडी घाटातील वाहतूक काही काळ बंद ठेवण्यात आली होती.

पोलादपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी रवाना होऊन टँकर मार्गस्थ करण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी वाहतूक थांबवली. त्यामुळे कशेडी घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती. दरम्यान, काहींनी आपली छोटी वाहने राजेवाडीमार्गे, तर काहींनी काटेतळीमार्गे नेण्याचा प्रयत्न केला. रात्री सुमारे साडेबारा वाजण्याच्या सुमारास टँकर मार्गस्थ करण्यात यश आले. त्यानंतर कशेडी घाटातील वाहतूक पूर्वपदावर आली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply