Breaking News

पूरग्रस्त भागांसाठी सहा हजार कोटींचा प्रस्ताव; राज्य सरकारचे केंद्राला साकडे

मुंबई : प्रतिनिधी

कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील अनेक भागांत आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त भागांसाठी 6813.92 कोटींच्या मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवून निधी देण्याची विनंती केली आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी (दि. 13) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 6813.92 कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा येथील पूरग्रस्तांसाठी 4708.25 कोटी रुपये; तर इतर कोकण, नाशिक व अन्य भागांना 2105.67 कोटी रुपये मदत करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचप्रमाणे या पुरामध्ये ज्यांची घरे पडली, वाहून गेली त्यांना त्यांची घरे सरकार बांधून देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांसह मंत्री देणार पूरग्रस्तांना एक महिन्याचा पगार

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, तसेच कोकण आणि विदर्भातील अनेक भागांत यंदा पूरस्थिती निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली आहे. या पूरग्रस्तांना मदतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व कॅबिनेट मंत्री आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री मदत निधीसाठी देणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबत माहिती दिली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply