रोहा ः प्रतिनिधी
स्वातंत्र दिनानिमित्त रोहा-अलिबाग मार्गावरील वावे पोटगे येथील प्राथमिक शाळेत गुरुवारी ध्वजवंदनानंतर बालसभेचे आयोजन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना बक्षिसे, लेखनसाहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. रोहिणी घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बालसभेला सरपंच राम गिजे, उपसरपंच प्रतीभा म्हात्रे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य भारत पाटील, हर्षदा घाणेकर, प्रगती ठाकूर, माधुरी गिजे, तंटामुक्ती समिती अध्यक्ष मोतीराम गिजे, आई कालकाई प्रतिष्ठान मित्रमंडळ अध्यक्ष भावेश पाटील, उपाध्यक्ष सुवर्णा घरत, चंद्रकांत गिजे, विलास पाटील, जगदीश घाणेकर, कृष्णा गिजे, संतोष घाणेकर, सुरेंद्र घाणेकर, अनंता ठाकूर, मुकेश गिजे, निशांत पाटील, प्रितम वाडकर यांच्यासह पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, अंगणवाडी, तसेच पहिली ते चौथीचे विद्यार्थी शिक्षक-पालक संघाचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होेते.