Breaking News

उलवे नोडमधील आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ

उलवे नोड : प्रतिनिधी

भारतीय जनता पक्ष उलवे नोड 1, डॉ. जी. डी. पोळ फाऊंडेशन आणि वर्ल्ड आयुष एक्स्पोच्या वतीने मोफत मेगा आरोग्य तपासणी शिबिर व स्क्रिनिंग कॅम्प शुक्रवारी (दि. 16) घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले, तर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिबिराला भेट देत सदिच्छा व्यक्त केल्या.

उलवे नोड येथील विघ्नहर्ता कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या आरोग्य शिबिरात डॉक्टरांच्या पथकाकडून डोळे, कान, नाक, घसा, हाडांचे विकार, स्त्रियांचे आजार, सर्वसाधारण तपासणी, दंतचिकित्सा करण्यात आली. अनेक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरास भाजप महिला मोर्चाच्या पनवेल तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, उलवे नोड 1 अध्यक्ष मदन पाटील, उलवे नोड 2 अध्यक्ष विजय घरत, एम. डी. खारकर, अंकुश ठाकूर, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, कामगार नेते सुरेश पाटील, चेतन घरत, शैलेश भगत, रवींद्र शिंदे, धीरज ओवळेकर, प्रदीप पाटील, शंकर पाटील, नामदेव ठाकूर, विठ्ठल ओवळेकर, पांडुरंगशेठ ओवळेकर, चिंतामण गोंधळी, प्रिया शिंदे, आशा पाटील, संगीता कांबळे, संगीता पाटील, नीलम ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply