Breaking News

कल्याणी लोखंडे यांचे मुख्याधिकार्यांकडून कौतुक

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जत नगरपरिषदेच्या लिपिक कल्याणी कांचन लोखंडे यांचे नगरपरिषचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. कार्यतत्पर कर्मचारी म्हणून हा गौरव करण्यात आला. कर्जत नगरपरिषदमध्ये सभा कामकाज म्हणून लिपिक कल्याणी लोखंडे या काम पाहत असतात. आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या सूचनेनुसार सात दिवसांत बैठकीचे ठराव (सभेचे इतिवृत्त) संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची कामगिरी उत्तमरित्या पार पाडली. सत्कारप्रसंगी लेखा परीक्षक जितेंद्र गोसावी, लेखापाल अरविंद नातू, अभियंता सारिका कुंभार, जल अभियंता अशोक भालेराव, नगररचनाकार लक्ष्मण माने, करनिरीक्षक सचिन सोनावणे, सुरेश खैरे, नरेंद्र गजभिये, बांधकाम विभागाचे रवींद्र लाड, निलेश चौडीए, सुदाम म्हसे, बापू बेहराम आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

आपल्याला दिलेले कर्तव्य निष्ठने व कालमर्यादेत नेहमीच पूर्ण करत असल्याचे दिसून येते ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे. आपण आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडत असल्याने आपले मनपूर्वक अभिनंदन व भविष्यातही आपल्याकडून चांगले कर्तव्य पार पाडण्यासाठी आपणास शुभेच्छा, असे पत्र मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिले आहे.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply