Breaking News

गौरी धात्रक ‘श्रावणक्वीन’

पनवेल ः वार्ताहर

घागर घुमू दे, हा मंगळागौरीचा बहारदार कार्यक्रम संवेदना चॅरिटेबल संस्था पनवेल तर्फे साजरा करण्यात आला. मंगळागौरीबरोबरच संस्थेतर्फे नऊवारी साज- मराठमोळा बाज या मराठी संस्कृती जपणार्‍या श्रावण क्विनचे आयोजन केले होते. या वर्षीच्या संवेदना श्रावणक्विन गौरी धात्रक ठरल्या.

श्रावण क्विनमध्ये पहिला क्रमांक स्मिता ठाकूर, दुसरा क्रमांक सुप्रिया जोगदंड यांना मिळाला, तसेच बेस्ट प्रॉप मंजुळा इरशेट्टी, बेस्ट अटायर आरती सोनटक्के, बेस्ट हेअरस्टाईल अंजली पाटील, बेस्ट स्माईल ऊर्मिला डांगे, बेस्ट मेकअप संगीता पवार, बेस्ट वॉक अंजनी जाधव, एक्स्प्रेशन क्विन परी घुलेबेस्ट, प्रेझेंटेशन अंजली देवानी यांना देण्यात आले. परीक्षक म्हणून विनर अप मिसेस इंडिया पॅसिफिक 2018 डॉ. नेहा मुळे होत्या. 2018च्या मानकरी नंदिनी भाटकर यांनी यंदाच्या विजेत्यांना साडी देऊन सन्मानित केले. संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा गवाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली

हा कार्यक्रम रंगला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply