नवी मुंबई : प्रतिनिधी
वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019 आणि आरोग्यच्या वतीने सीवूड्स येथील गणपत तांडेल मैदानात घेण्यात आलेल्या योगदौडमध्ये नवी मुंबईतील आबालवृद्धांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या योगदौडमध्ये सहभाग घेत आरोग्याबद्दल जनजागृती केली.
वर्ल्ड आयुष एक्स्पो 2019 आणि आरोग्यचे आयोजन समिती अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी ध्वज फडकवत योगदौडची सुरुवात केली. तीन, पाच आणि सात किलोमीटरच्या या दौडमध्ये महिला आणि पुरुष अशा विविध गटांमध्ये हजारो स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. रविवार सुटीचा दिवस असतानाही पहाटे सहा वाजल्यापासूनच स्पर्धकांनी नोंदणीसाठी तुफान गर्दी केली होती.