खोपोली : प्रतिनिधी
खोपोली शहरातील भानवजकडे जाणार्या मार्गावर वन विभागाच्या जमिनीमध्ये अनेकांनी अनाधिकृत टपर्या आणि पत्र्याच्या शेड उभारल्यामुळे वाहतुकीला अढथळा निर्माण झाला होता. वनखात्याच्या अधिकार्यांनी पोलीस खात्याला बरोबर घेऊन येथील सुमारे 19 अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.
शहरातील भानवजकडे जाणार्या मार्गावर वनखात्याच्या जागेवर अनाधिकृतपणे बांधकाम केल्याने या ठिकाणाहून जाताना वाहतुकीला अडथळे निर्माण झाले होते. त्याची दखल घेत अलिबाग येथील उप वनसंरक्षक मनीष कुमार यांच्या आदेशानुसार खालापूर वनविभागाने तेथील सुमारे 19 अनाधिकृत बांधकामे जमिनदोस्त केली.