नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
काही दिवसांपूर्वी आटोपलेल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सहभागी झालेले अनेक क्रिकेटपटू आता एकापाठोपाठ एक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण, सुब्रह्मण्यम बद्रिनाथ यांच्यानंतर आता इरफान पठाणलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.
इरफान पठाणने सोशल मीडिवरून ट्विट करीत याबाबतची माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र मला कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत. मी स्वत:ला आयसोलेट केले असून, मी घरीच क्वारंटाइन आहे. गेल्या काही दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी, तसेच सर्वांनी मास्कचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन त्याने केले आहे.
गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटिव्ह आलेला इरफान पठाण हा चौथा भारतीय क्रिकेटपटू आहे. त्यापूर्वी सुब्रह्मण्यम बद्रिनाथ, युसूफ पठाण आणि सचिन तेंडुलकर यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
हरमनप्रीत कौर पॉझिटिव्ह
दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघातील आघाडीची खेळाडू हरमनप्रीत कौर हिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तिला कोरोनाची काही लक्षणे दिसत असून, तिला होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …