शांघाई : वृत्तसंस्था
चीनमध्ये झालेल्या वर्ल्ड पोलीस अॅण्ड फायर गेम्समध्ये भारतीय पोलीस दलाच्या महिला प्रतिनिधीने देशाची मान उंचावली आहे. या स्पर्धेत भारताच्या पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करणारी महिला कॉन्स्टेबल मोनिका जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली. तिने दोन सुवर्णपदकांसह एकूण तीन पदके पटकावली आहेत. मोनिका जाधव बुलडाणा पोलीस दलात कार्यरत असून आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. चीनमध्ये झालेल्या स्पर्धेत मोनिकाने टार्गेट आर्चरी या प्रकारात 720 पैकी 716 गुण मिळवित विक्रम नोंदविला. फिर्ल्ड आर्चरीमध्ये तिने सुवर्ण, तर थ्रीडी आर्चरी प्रकारात कांस्यपदक मिळविले.