उरण ः प्रतिनिधी
नेहरू युवा केंद्र अलिबाग, रायगड युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार, वीर वाजेकर स्पोर्टस अॅण्ड कल्चरल अकॅडमी व महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे याच्या संयुक्त विद्यमाने रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे येथे स्वच्छता पंधरवाडा सार्वजनिक स्वच्छता व वैयक्तिक स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. या शिबिराची सुरुवात रामचंद्र म्हात्रे विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्वच्छता शपथ देऊन करण्यात आली.
स्वच्छतेचे महत्त्व महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव गायकवाड व पंचायत समिती उरणचे अधिकारी शैलेश पिंकलेकर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पटवून दिले. नंतर विद्यार्थ्यांनी गावामध्ये स्वच्छता घरी लक्ष्मी नांदे घरोघरी या घोषणा देत, स्वच्छता प्रदक्षिणा पूर्ण केली. त्यानंतर म्हणजे शाळेभोवतालच्या परिसराची स्वच्छता करून हॅण्ड वॉशचा वापर करून वैयक्तिक स्वच्छता कशी करावी याचे प्रात्यक्षिक केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव गायकवाड व पंचायत समिती उरणचे अधिकारी शैलेश पिंकलेकर, नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आकाश घरत, युवा केंद्राचे स्वयंसेवक प्रणव पाटील, विद्यालयातील शिक्षकवृंद शकुंतला पाटील, संगीता म्हात्रे, वैभव गावंड, संजय नाईक हे उपस्थित होते. प्रास्ताविक आकाश घरत आणि सूत्रसंचालन निवास गावंड यांनी केले.