पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका अंतर्गत पनवेल येथे तालुका क्रीडा संकुलात नुकतीच ज्युडो स्पर्धा झाली. या स्पर्धेत कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उज्ज्वल यश संपादन केले.
14 वर्षांखालील मुलांच्या गटात आर्यन पन्हाळे (इयत्ता सहावी) याने प्रथम क्रमांक, मुलींमध्ये जान्हवी पवार (इयत्ता सहावी) हिने द्वितीय क्रमांक, 17 वर्षांखालील मुलींमध्ये हर्षाली भोईर (इयत्ता दहावी) हिने प्रथम क्रमांक, मुलांमध्ये- साहिल जाधव (इयत्ता नववी) याने द्वितीय क्रमांक, 19 वर्षांखालील मुलांमध्ये महेश विश्वकर्मा (इयत्ता बारावी) याने प्रथम क्रमांक आणि रोहित सालियन (इयत्ता बारावी) याने प्रथम क्रमांक पटकावला.
या विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्या रूपाली जोगदंड यांचे सिडको अध्यक्ष तथा शाळेचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर, मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे यांनी कौतुक करून अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.