Breaking News

रोडपाली स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनंतर त्वरित कार्यवाही

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रोडपाली येथील स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी (दि. 23) सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या ठिकाणी पाहणी केली.  त्या अनुषंगाने महापालिकेचे आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांना हा परिसर स्वच्छ करण्याचे सूचित केले. त्यानंतर काही तासातच महापालिकेने स्वच्छता मोहीम राबवून गवत कापून टाकले. तसेच येथील कचरा उचलून स्वच्छता केली.

कळंबोळीमध्ये रस्ते, गटारे, स्मशानभूमी, तलाव तसेच इतर नागरी समस्यांची सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. या वेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक अमर पाटील, राजू शर्मा, नगरसेविका प्रमिला पाटील, कळंबोळी शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, युवामोर्चा शहर अध्यक्ष अमर ठाकूर, डी. एन. मिश्रा, राजू बनकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान रोडपाली येथील स्मशानभूमीची मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. सिडकोने या ठिकाणी मोडकळीस आलेल्या दोन शवदाहिनी पैकी एकाचे काम नव्याने हाती घेतले आहे. ज्या ठिकाणी लहान मुलांचे दफन करण्यात येते. तेथे मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडेझुडपे वाढली होती. त्यामुळे लहान मुलांचे मृतदेह दफन करताना नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. तसेच एक प्रकारचे जंगल याठिकाणी वाढल्याने साप व  इतर प्राण्यांचा  उपद्रव वाढला होता. त्यामुळे अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत येणारे मृतांचे नातेवाईक, तसेच या ठिकाणी काम करणारे कामगार असुरक्षिततेची भावना व्यक्त करीत होते.

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी माजी स्थायी समिती सभापती अमर पाटील यांच्यासह कळंबोली नोडचा दौरा केला. त्यांनी तलावालगत असलेल्या स्मशानभूमीची पाहणी केली. त्यावेळी येथील बाल दफनभूमीला जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेचे निरीक्षक दौलत शिंदे यांच्याशी संपर्क साधून स्मशानभूमीतील गवत आणि झाडे झुडपे काढून घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार तासाभरात शिंदे यांनी येथे कामगार

आणि ग्रास कटर मशीनच्या माध्यमातून स्वच्छता केली.-दोन ग्रास कटर मशीन तसेच 25 सफाई कामगारांच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात आले. इतकेच नाही तर आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांनी कामगारांना काही काळ विश्रांती देत स्वतः ग्रास कटर मशीन गळ्यात अडकवून स्मशानभूमीतील गवत कापले. स्वच्छता निरीक्षक संतोष सोनवणे, दीपक सिलकन, मनोज चव्हाण, सुमित गायकवाड यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply