Breaking News

प्रत्येक माणसाला आयुषशी जोडणार : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक

आरोग्यदायी महोत्सवाचे शानदार उद्घाटन

नवी मुंबई : प्रतिनिधी

आयुष मंत्रालयाचे मागील पाच वर्षांत 100हून अधिक कार्यक्रम झाले. ही पद्धती जगाचे कल्याण करणारी आहे. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक माणसाला आयुषशी जोडायचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष नाईक यांनी केले. ते वाशी येथे बोलत होते.

आयुष मंत्रालय भारत सरकार, राज्य सरकार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषद, एमसीआयएम, सिडको, नवी मुंबई महापालिका, डॉ. डी. जी. पोळ फाऊंडेशन आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्ल्ड आयुष एक्स्पो आणि आरोग्य 2019 या जागतिक स्तरावरील आरोग्यदायी महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि. 22) ना. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते वाशी येथे झाले.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन व कन्व्हेंशन सेंटर येथे सुरू असलेल्या या चार दिवसीय महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास सिडको चेअरमन तथा आयोजन कमिटीचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, आमदार संदीप नाईक, नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, ऋषिकेश पोळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आयुष जगात सर्वांपर्यंत न्यायचे आहे. आयुषबाबत सातत्याने रिसर्च सुरू आहे. आयुषची 12 सहस्रांहून अधिक केंद्र चालू केली आहेत. आपले 14 देशांशी करार झाले असून, वर्ल्ड हेल्थमध्ये आपला प्रतिनिधी चार वर्षांपासून जातोय, ही मोठी अभिमानास्पद बाब आहे, असे ना. नाईक यांनी सांगितले.

डॉ. विष्णू बावणे यांनी रुग्ण, शास्त्र आणि राष्ट्रासाठी एकत्र आलो आहोत. या कार्यक्रमात 30 देशांतून प्रतिनिधी आले आहेत. आयुर्वेदाचे 21, पंचगव्य, योगा, युनानी यावर कार्यक्रम असल्याचे सांगितले. याअंतर्गत शेतकरी आणि व्यावसायिक यांची सांगड घालून देण्यात येणार असून, पारंपरिक चिकित्सा प्रणाली, मोफत आरोग्य शिबिर, आरोग्य सर्वांसाठी हे ध्येय ठेवून कार्य करीत असल्याचेही ते म्हणाले. डी. जी. पोळ फाऊंडेशनचे ऋषिकेश पोळ यांनीही आपले विचार मांडले.

आयुष हा अमूल्य ठेवा  -आमदार प्रशांत ठाकूर

सिडको अध्यक्ष तथा आयोजन कमिटीचे प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना सांगितले की, आयुष हा देशासाठी अमूल्य ठेवा असून, त्यास संपूर्ण जगापर्यंत नेणार आहोत. अ‍ॅलोपॅथीच्या माध्यमातून जे शक्य नव्हते ते आयुर्वेदाच्या माध्यमातून साध्य होत आहे. आयुष मंत्रालयाने केलेली मेहनत आज फळाला आली आहे. आयुषला उज्ज्वल भविष्य आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply