


पनवेल ः भारतीय जनता पार्टी कळंबोली शहराचे अध्यक्ष अमर ठाकूर यांच्या पुढाकाराने कळंबोलीतील साखरशेठ चौका स्व. त्रिंबक जोमा ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि अजिंक्यतारा मित्र मंडळ रोडपाली यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या दहिहंडी उत्सवाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, प्रभाग समिती क चे अध्यक्ष संजय भोपी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.