Breaking News

भाजपवरील जनतेचा विश्वास वाढवा

जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांचे आवाहन

पनवेल : प्रतिनिधी

जनतेचा आपल्या भारतीय जनता पक्षावर विश्वास निर्माण झाला आहे. हा विश्वास वाढविण्यासाठी बूथ कार्यकर्त्यांनी पोस्टमनची भूमिका बजवावी, असे आवाहन भाजपचे रायगड जिल्हा

संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांनी रविवारी (दि. 25) केले. ते भाजप उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलनात बोलत होतेे. जातीपातीचे राजकारण न करता उरणचा विकास करणार्‍या महेश बालदी यांना कोणतीही ताकद पराभूत करू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

पुन्हा आणूया आपले सरकार, या शीर्षकाखाली भाजप उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन रविवारी खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर झाले. या संमेलनास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार देवेंद्र साटम, जेएनपीटीचे विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, जिल्हा सरचिटणीस श्रीनंद पटवर्धन, प्रवक्ते वाय. टी. देशमुख, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, रामदास ठोंबरे, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष कल्पना राऊत, पनवेल तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, पनवेल उरण विधानसभा विस्तारक अविनाश कोळी उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द करून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानणारा ठराव मांडून रायगड जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. महेश बालदी यांनी उरण मतदारसंघात आमदार, खासदार यांना लाजवेल एवढा विकास केल्याची साक्ष या मेळाव्याला जमलेल्या गर्दीमुळे आपल्याला मिळते.

उरणमध्ये आपल्यासाठी चांगले वातावरण असून, महेश बालदी यांचा झंझावात कोणीही रोखू शकणार नाही, असे आमदार दरेकर म्हणाले.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, अनेक आमदार आपला कार्य अहवाल सादर करीत नाहीत, पण महेश बालदी यांनी आमदार नसतानाही कार्य अहवाल सादर केला हे महत्त्वाचे आहे. ज्यांना विकास करावयाचा आहे त्यांना भाजपशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

महेश बालदी यांनी उरण मतदारसंघात मी बोललो ते केले, पण फलक लावले नाहीत, असा टोला विद्यमान आमदारांना लावला. या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे मान्यवरांनी स्वागत केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply