Breaking News

जांभिवलीतील शेकाप, शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त

उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलनात भाजपचे चौक पंचायत समिती विभाग अध्यक्ष काशिनाथ गावडे यांच्या नेतृत्वाखाली जांभिवली (चौक) येथील शेकाप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख आमदार प्रवीण दरेकर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उरण बूथ कार्यकर्ता संमेलन रविवारी (दि. 25) पनवेलमध्ये झाले.

या संमेलनात नीलेश गावडे, विश्वनाथ शेळके, रोशन गावडे, राजा गावडे, भरत गावडे, बाळू गावडे, जनार्दन कोंडिलकर, नामदेव कोंडिलकर, दीपक गावडे, जयेंद्र गावडे, हरिश्चंद्र गावडे, दशरथ गावडे, महेश गावडे, संजय गावडे, भाऊ गावडे, भीमसेन गावडे, नितेश गावडे, कमलाकर गावडे, नथुराम गावडे, या  कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपत जाहीर प्रवेश केला. या वेळी खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, गणेश कदम, प्रकाश घोगरे, गणेश मुकादम, अनंता राणे आदी उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply