उरण ः प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील शिवराज प्रतिष्ठान उरणतर्फे सुमारे 100 पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी वह्या, पेन, पेन्सिल असे शैक्षणिक साहित्य करवीर तालुक्यातील चिखली, भुये, शिये, वरगणे, पाडली या गावातील शाळांना वाटप करण्यात आले. शिवराज प्रतिष्ठानचे संस्थापक संदेश ठाकूर यांच्या हस्ते ते पूरग्रस्त भागात पाठविण्यात आले.
या वेळी खजिनदार उमेश वैवडे, विश्वस्त दिनेश हळदनकर, सदस्य सुभाष पाटील, दीपक प्रसादे, अनिल प्रधान, धनंजय भोरे, गणेश तांडेल, राजेश सरफरे आदी सदस्य उपस्थित होते. राजू माळी व नागेश चव्हाण यांचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले. हे साहित्य कोल्हापूरला नेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते, आदर्श उपक्रमशील शिक्षक कौशिक ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.