रोहे ः प्रतिनिधी
अलिबाग येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेतर्गत तलवारबाजी या खेळात वरसगाव येथील एमडीएन फ्युचर स्कूलचा विद्यार्थी उत्कर्ष नितीन मानकर याने 14 वर्षे गटात दुसरा क्रमांक पटकाविला. त्याची मुंबई विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
उत्कर्ष आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि क्रीडा शिक्षक भारत गुरव यांना देतो. या यशाबद्दल शाळेच्या स्टाफ व संचालक मंडळाने उत्कर्षचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.