सुधाकर देशमुखांची बदली
पनवेल ः वार्ताहर
पनवेल महानगरपालिका आयुक्तपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर येथील आयुक्त सुधाकर देशमुख यांची भिवंडी-निजामपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.
साधारण एक वर्षापूर्वी गणेश देशमुख हे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत होते. त्यानंतर त्यांची अचानकपणे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली होती व त्यांच्या जागेवर सुधाकर देशमुख यांनी पदभार स्वीकारला होता. शासनाकडून मंगळवारी (दि. 22) पुन्हा गणेश देशमुख यांची पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलीे. त्यांची महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या कलम 36नुसार पनवेल महानपालिका आयुक्त या पदावर प्रशासकीय कारणास्तव नेमणूक करण्यात आली आहे, तर सुधाकर देशमुख यांना भिवंडी-निजामपूर महापालिकेचा कार्यभार देण्यात आला आहे.