Breaking News

पनवेल-गोरेगाव लोकल ही अफवाच!

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल-गोरेगाव लोकल लवकरच सुरू होणार ही अफवाच आहे. पनवेल-गोरेगाव लोकल इतक्यात सुरू होणार नसून, त्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार असल्याची माहिती पनवेल स्टेशनचे प्रबंधक एस. एम. नायर यांनी दिली. पनवेलहून अंधेरी, बोरवली आणि विरार भागात रोज अनेक जण नोकरी धंद्यासाठी जातात. त्यांना पनवेलहून अंधेरीला जाण्यासाठी वडाळामार्गे जाणारी लोकल आहे. अंधेरीच्यापुढे जाणार्‍यांसाठी अंधेरीला उतरून पश्चिम रेल्वेची दुसरी लोकल पकडून पुढे जावे लागते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून हार्बर मार्गावरून गोरेगाव लोकल सुरू झाली आहे. त्यामुळे आता पनवेलहून ही गोरेगाव लोकल सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनेने अनेक वेळा केलेली आहे. मध्य रेल्वे त्याचा विचार करीत असल्याचे सांगण्यात येते. पनवेल-गोरेगाव लोकल लवकरच सुरू होणार अशा बातम्या काही इंग्लिश वर्तमानपत्रात आल्याने अनेकांनी पनवेल रेल्वेस्टेशन प्रबंधक एस. एम. नायर यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता त्यांनी सध्या तरी गोरेगाव लोकल सुरू होणार नाही. भविष्यात गोरेगाव लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती त्यांनी दिली.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply