Breaking News

पनवेलमध्ये 70 लाभार्थींना कृत्रिम अवयव प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त

सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. त्या अंतर्गत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या वतीने मोफत जयपूर फूट कॅम्प आयोजित करण्यात आला होता. त्यातील 70 लाभार्थींना रविवारी (दि. 8) कृत्रिम अवयव प्रदान करण्यात आले.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या पनवेल मार्केट यार्ड येथील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणूनआमदार प्रशांत ठाकूर, भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अनिल भगत, डॉ. सचिन जाधव आदी उपस्थित होते. जयपूर फुट कॅम्पमध्ये सहभाग घेतलेल्या शिबिरार्थींची वैद्यकीय तज्ज्ञांमार्फत तपासणी करण्यात आली होती. त्यांना आवश्यक असलेले कृत्रिम हात-पाय बसविण्यासाठी मापे घेऊन त्यानुसार अवयव तयार केले गेले. ते रविवारी बसविण्यात आले. याबद्दल त्यांनी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशनचे आभार मानले. या उपक्रमाबद्दल साधू वासवानी मिशनचे सुशील ढगे यांनी या वेळी माहिती दिली.

Check Also

खारघर हिल महापौर मॅरेथॉन प्रोमो रनला उत्तम प्रतिसाद

खारघर ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने रविवारी (दि.19) आयोजित करण्यात आलेल्या खारघर हिल महापौर मॅरेथॉन …

Leave a Reply