Breaking News

उलवे विस्थापित शाळेचे उद्घाटन

उलवे नोड : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील न्यू इंग्लिश स्कूल विस्थापित शाळेचे उद्घाटन सोमवारी (दि. 9) संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. ही शाळा उलवे नोड सेक्टर 21, प्लॉट नं. 87, आरामस कॉम्प्लेक्स येथे स्थलांतरित झाली आहे.

या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य महेंद्र घरत, रायगड विभागीय सहाय्यक निरीक्षक शहाजी फडतरे, जनसंपर्क अधिकारी श्री. कारंडे, न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन शरद खारकर, मुख्याध्यापक एस. के. पाटील, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता अजय भगत, तरघर ग्रामपंचायतीच्या सरपंच चैताली संदीप वाजेकर, उलवे ग्रामपंचायतीच्या सरपंच कविता राजेश खारकर, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, भाजप पदाधिकारी उत्तम कोळी, पांडूशेठ ओवळेकर, मदन पाटील, निलेश खारकर, राजेश खारकर, डॉ. श्रद्धा मयूर पाटील, तसेच ‘रयत’चे प्रमोद कोळी, गव्हाण हायस्कूलच्या मुख्याध्यापिका खटावकर मॅडम आदी उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply