Breaking News

शिबिरात 27 जणांचे रक्तदान

अलिबाग : प्रतिनिधी येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि स्वयंसिध्दा संचलित स्पर्धा विश्व अ‍ॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमधील जंजिरा सभागृहात घेण्यात आलेल्या शिबिरात 27 जणांनी रक्तदान केले. प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तपस्वी गोंधळी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, आंतरराष्ट्रीय धावपटू प्रशांत पाटील, प्रा. स्नेहल आंब्रे, राजश्री पाटील, ममता नाईक, अ‍ॅकॅडमीच्या संचालिका सुचिता साळवी, यशोधन पतपेढीचे चेअरमन चंद्रशेखर वागळे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. ब्लड बँकेचे रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दीपक गोसावी, रक्तपेढी तंत्रज्ञ हेमकांत सोनार व त्यांच्या सहकार्‍यांनी रक्त संकलनाचे काम केले. रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रिझम संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply