Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिरास उत्तम प्रतिसाद

पनवेल ः हरेश साठे
कोरोना महामारीने संपूर्ण जगासमोर मोठे संकट आले. अशा परिस्थितीत लोकसंख्येचा विचार करता आपल्या भारत देशावर त्याचा मोठा दुष्परिणाम झाला असता, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योग्य निर्णय आणि उपाययोजनांनी कोरोनाच्या संकटकाळातही देशाला सावरले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी शनिवारी (दि. 2) खांदा कॉलनी येथे केले.
सेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या वेळी कोरोना योद्ध्यांचा सत्कार, तसेच अपंगांना तीनचाकी सायकलचे वाटप करण्यात आले. त्या वेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
महिलांच्या गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे. याची चाचणी महागडी असल्याने महिला याकडे दुर्लक्ष करतात. या कॅन्सरच्या निर्मूलनासाठी लसीकरण महाशिबिराचे दोन दिवस आयोजन करण्यात आले असून यात किमान एक हजार मुलींचे लसीकरण होणार आहे.  
मंत्री भारती पवार यांनी पुढे म्हटले की, कर्करोगाचे वेगळे प्रकार आणि वेगवेगळ्या देशात संख्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. त्यामुळे त्याप्रमाणे त्यावर उपचार यंत्रणा राबविली जाते. भारतात कर्करोगाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच त्यावर तत्काळ उपचार करणे गरजेचे असून त्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. महिला आरोग्यदायी तर कुटुंब सुदृढ अशी संकल्पना सत्यात आहे. म्हणून प्रत्येक महिलेने आरोग्याच्या बाबतीत जागरूक राहणे गरजेचे असून या त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकार योग्य त्या उपाययोजना करीत आहे. कोरोनाच्या काळात सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विचार करीत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर भर दिला. देशातील नागरिकांना मोफत लस देण्यासाठी त्यांनी 35 हजार कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले आणि आपला भारत 89 कोटी लसीकरण करणारा अव्वल देश ठरला आहे.
कोरोना महामारीविरोधात लढतानाच कर्करोग, तसेच क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारचा आरोग्य विभाग कार्यरत आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजनेच्या अनुषंगाने 50 कोटी लाभार्थी असून दोन कोटी नागरिकांनी त्याचा लाभही घेतला आहे. आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनातून देशात मेडिकल कॉलजचे प्रमाण वाढले असून एकेकाळी सहा ‘एम्स’ होत्या, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टिकोनातून 22 ‘एम्स’ निर्माण झाल्या आहेत. अशा प्रकारे आरोग्य क्षेत्रात दिवसेंदिवस आपला देश प्रगती करीत आहे. आरोग्यसेवेचा वसा वृद्धिंगत करण्यासाठी आणि भारताच्या विकासासाठी ’सबका साथ, सबका विश्वास, आणि सबका प्रयास’ महत्त्वाचा आहे, असे सांगून कोरोना काळात देशाच्या सीमेवर असलेल्या सैनिकांप्रमाणे कोरोना योद्ध्यांनी काम केल्याचे सांगत त्यांच्याप्रती आदर व अभिमानही या वेळी मंत्री पवार यांनी व्यक्त केला तसेच सेवा अभियानातून विविध आरोग्य उपक्रम राबवित जीवांचे रक्षण करण्याचे काम होत असल्याचे अधोरेखित केले.
महाशिबिराचे निमंत्रक आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी आपल्या भाषणात सांगितले की, पूर्वी पनवेलला 30 खाटांचे शासकीय रुग्णालय होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनातून 130 खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात भरीव मदत झाली. पालकमंत्री असताना चव्हाण यांनी जिल्हा नियोजनांमधून तब्बल आठ कोटी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे हे पनवेल उपजिल्हा रुग्णालय उभे राहिले. उद्घाटनानंतर ते कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी समर्पित झाले आहेत. त्यामुळे सेवा करणारे केंद्र म्हणून उपजिल्हा रुग्णालयाची ओळख निर्माण झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र नरेंद्र मोदी सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून विविध योजना अमलात आणून देशाचा विकास केला जात आहे. कोरोना काळात जग संकटात असताना आपल्या भारत देशासह जगाला धैर्य देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले असून यांच्या रूपाने जगाला सक्षम नेतृत्व लाभले आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले.
व्यासपीठावर युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशनच्या कार्यकारी संचालिका डॉ. धनंजया सारनाथ, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, ओमप्रकाश शेट्टी, राजेश सोमनार, डॉ. गिरीश गुणे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहराध्यक्ष वर्षा नाईक, मनपा महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती सुशीला घरत, हेमलता म्हात्रे, अनिता पाटील, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रूचिता लोंढे, सीता पाटील, राजेश्री वावेकर, वृषाली वाघमारे, संजना कदम, हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील, कुसुम म्हात्रे, प्रमिला पाटील, विद्या गायकवाड, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, नीता माळी यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित होते. महाशिबिर यशस्वी करण्यासाठी चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन, भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समाजाप्रती असलेल्या योगदानाचा आढावा घेतला तर त्यांच्याविषयी बोलायला वेळ कमी पडेल. प्रचंड सामाजिक कार्याची जोड त्यांच्याकडे आहे. सतत समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी स्वतःला अक्षरश: वाहून घेतले आहे.
-भारती पवार, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री  

लेकींच्या आरोग्यासाठी उपक्रम राबविणार -आमदार प्रशांत ठाकूर
महाशिबिराचे निमंत्रक आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पनवेल नगरपालिका 1852 साली स्थापना झाली. वाढती लोकसंख्या आणि आधुनिकीकररण लक्षात घेता महानगरपालिका झाली पाहिजे या दृष्टिकोनातून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिका निर्माण केली. देशातील प्रत्येक घटकातील, राज्यातील नागरिक पनवेल परिसरात वास्तव्यास आहेत. येथे असलेल्या मुली या पनवेलच्या लेकी आहेत. त्यामुळे लेकींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य त्या उपक्रमाचे आयोजन होत असून यापुढेही लेकींच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमाचे आयोजन करणार आहोत. धन्वंतरी संस्था स्थापन करून रुग्णांना सेवा व डॉक्टरांचा सन्मान करण्याचे प्रयत्न केले जात आहे. आजच्या या प्रयत्नातून मोठी झेप घेता आली आहे.

चौकटआमदार प्रशांत ठाकूर महिलांना सक्षम करताहेत -महापौर डॉ. कविता चौतमोल
कोरोनाच्या काळात सर्व घटकांना तळागाळात मदत करण्याचे काम लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. कोरोनाचा काळ वगळता गेल्या वर्षापासून आरोग्य महाशिबिरे घेतली जात आहेत. आमदार प्रशांत ठाकूर कार्यकुशल आहेत आणि ते मोठ्या भावाप्रमाणे महिलांना सक्षम करण्याचे काम करीत असतात. त्यांच्यामुळेच आजचा हा उपक्रम होत असून पनवेमधील सर्व महिलांना अशा प्रकारच्या शिबिरातून लसीकरण करण्याचे काम ते करणार आहेत, असे सांगून पनवेल परिसरात माता व बाल संगोपन अद्ययावत केंद्रासाठी मदत करण्याची मागणी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी प्रास्ताविकातून मंत्री भारती पवार यांच्याकडे केली.  

कोरोना योद्धा सन्मान
डॉ. गिरीश गुणे, डॉ. संतोष जाधव, डॉ. चंद्रकांत शिंदे, डॉ. विशाल किणी, डॉ. माधुरी दांडेकर, डॉ. आशिष गांधी, डॉ. हेमंत इंगळे, डॉ. अमित मायकर.
अंत्यविधी सेवक सन्मान
विनायक शेळके, दिलीप पाटील, नितीन करके, रमेश आखाडे, यज्ञेश सोनके.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply