Breaking News

भाजयुमो पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यात भाजप युवा मोर्चाच्या विविध पदांवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या असून, भाजपचे तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे यांनी त्यांना नियुक्तिपत्रे प्रदान केली.

युवा मोर्चाच्या माणगाव तालुका उपाध्यक्षपदी हसिम अकलेकर, शहराध्यक्षपदी राजेश तेटगुरे, मोर्बा शहराध्यक्षपदी मुकेश पवार, तसेच अल्पसंख्याक मोर्चा तालुका चिटणीसपदी मुश्ताकभाई बंदकर, तालुका सरचिटणीसपदी रफिक नाडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माणगाव येथील भाजप कार्यालयात बुधवारी (दि. 18) झालेल्या कार्यक्रमात भाजपचे तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. या वेळी भाजप तालुका उपाध्यक्ष उमेश साटम, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा यशोधरा गोडबोले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राकेश पवार, अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष कमलोद्दीन मांडलेकर, तालुका उपाध्यक्ष अस्लम वहूर यांच्यासह संतोष कदम, बाबूराव चव्हाण आदी पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …

Leave a Reply