Breaking News

खा. सुनील तटकरे समर्थक नगराध्यक्षाला महिलांकडून चोप

श्रीवर्धन ः प्रतिनिधी

पतसंस्थेत ठेवीदारांचे पैसे गुंतवलेले असूनही ते देण्यास टाळाटाळ करणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्याला ठेवीदारांनी चोप दिला. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र तथा अप्पा भुसाणे हे श्रीवर्धन नगरपालिकेचे नगराध्यक्षही आहेत. पतसंस्थेमध्ये ठेवीदार आपल्या कष्टाची कमाई जमा करतात, पण भुसाणे व्यवस्थापक असलेल्या पतसंस्थेमध्ये ठेवलेले पैसे गेल्या कित्येक महिन्यांपासून मिळत नसल्याने ठेवीदारांचा संयम अखेर सुटला.

शहरातील जनसेवा पतसंस्थेतील ठेवीदारांना गेल्या दोन महिन्यांपासून पैसे मिळत नाहीत. कायदेशीर प्रक्रिया सुरू असून त्यानंतर पैसे दिले जातील, अशी नोटीसवजा कागदी माहिती पतसंस्थेच्या कार्यालयावर लावण्यात आली होती. पतसंस्थेच्या संचालकांकडून 19 तारखेपर्यंत सर्व ठेवीदारांना पैसे परत केले जातील, असे सांगण्यात आले. गुरुवारी (दि. 19) सकाळपासून बँकेच्या ठेवीदारांनी पैशांच्या परताव्यासाठी जनसेवेच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली होती.

पतसंस्थेकडून पैसे परत मिळत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर ठेवीदार आक्रमक बनले आणि त्यांनी पतसंस्थेचे व्यवस्थापक श्रीवर्धनचे नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत ठेवीदारांना काही वेळेसाठी शांत करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित सर्व ठेवीदारांनी आपला मोर्चा श्रीवर्धन पोलीस ठाण्याकडे वळवला आणि पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलनास सुरुवात केली.

पतसंस्थेचे व्यवस्थापक आणि संचालकांवर गुन्हा दाखल करा आणि आमचे पैसे व इतर ठेवी परत करा, अशी मागणी ठेवीदारांनी केली. ठेवीदारांची आक्रमक भूमिका पाहून पोलिसांनी पोलीस ठाण्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद केले. ठेवीदारांनी केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे श्रीवर्धन शिवाजी चौक ते एसटी स्टॅण्ड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. नागरिकांपुढे पोलिसांनाही हार पत्करावी लागली. अखेर पतसंस्थेचे चेअरमन निळकंठ कर्णेकर व विठ्ठल श्रीवर्धनकर यांना श्रीवर्धन पोलीस ठाण्यात आणले. या वेळी अतुल चोगले, पिंट्या वेश्वीकर, प्रशांत शिंदे, सुनील दर्गे, बंड्या आगरकर, आप्पा बोरकर, उमेश जैन, सचिन गुरव आदी 10 ते 15 लोक व श्रीवर्धन पोलीस उपअधीक्षक बापूराव पवार, पोलीस निरीक्षक पी. डी. बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. गावडे, श्री. महाडिक, श्री. पेडवी व इतर कर्मचारी यांच्या समवेत चर्चा करण्यात आली.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply