Breaking News

पनवेल विधानसभा मतदारसंघात आजपासून भाजपच्या बैठकांचा धडाका

पनवेल : रामप्रहर वृत्त

विधानसभा निवडणूक जाहीर होताच भारतीय जनता पक्षाने पनवेल मतदारसंघामध्ये प्रचारात आघाडी घेतली असून, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि महापालिका प्रभागवार बैठकांचे आयोजन सोमवार (दि. 23)पासून करण्यात आले आहे.

भाजप पनवेल तालुका मंडलच्या वतीने विधानसभा निवडणुकीसंदर्भात बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. यानुसार सोमवारी (दि. 23) चिंध्रण पं. स. गणाची बैठक सकाळी 11 वाजता एकनाथ देशेकर यांच्या निवासस्थानी, नेरे गणाची बैठक दुपारी 2 वा. सन्मित्र गणेश मंडळ सभागृहात, आदई गणाची बैठक सायंकाळी 4 वा. ओमकार ब्रम्हा सोसायटीत होणार आहे.

मंगळवारी (दि. 24) पाली-देवद गणाची बैठक दुपारी 2 वा. सुकापूर येथे राजेश जनार्दन पाटील यांच्या निवासस्थानी आणि विचुंबे गणाची बैठक तेथील समाजमंदिरात सायंकाळी 4 वा. होणार आहे. बुधवारी (दि. 25) प्रभाग 2ची बैठक दुपारी 1 वा. पडघे येथे कृष्णा पाटील यांच्या निवासस्थानी, प्रभाग 1ची बैठक 3.30 वा. पेंधर येथे संतोष भोईर यांच्या निवासस्थानी, प्रभाग 3ची बैठक सायंकाळी 5.30 वा. खारघर सेक्टर 33 येथील रामशेठ ठाकूर कॉलेजमध्ये, प्रभाग 4ची बैठक सायंकाळी 7 वा. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये होणार आहे.

गुरुवारी (दि. 26) पळस्पे जिल्हा परिषद गटाची बैठक सकाळी 11 वा. बेलवली येथील श्रीगणेश सभागृहात, प्रभाग 5ची बैठक सायंकाळी 5 वा. व प्रभाग 6ची बैठक 7 वा. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये होणार आहे. शुक्रवारी (दि. 27) कळंबोली गाव मंगल कार्यालयात प्रभाग 7ची बैठक सायंकाळी 4 वा., प्रभाग 8ची बैठक 5.30 वा., प्रभाग 9ची बैठक 6.30 वा आणि प्रभाग 10ची बैठक 7.30 वा. होणार आहे, तर शनिवारी (दि. 28) कामोठे सेक्टर 6 येथील ज्ञानसाधना केंद्रात प्रभाग 11, 12 व 13ची बैठक अनुक्रमे सायंकाळी 5, 6.30 व 7.30 वा. होणार आहे.

या बैठकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक-नगरसेविका, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply