Breaking News

देशी-विदेशी मद्याचा साठा हस्तगत

पनवेल : वार्ताहर पनवेल विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019च्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलिसांनी धडक मोहीम राबविण्यास सुरुवात केली असून, वपोनि अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तालुक्यातील कसळखंड येथे छापा टाकून एका इसमास देशी-विदेशी मद्याच्या साठ्यासह ताब्यात घेतले आहे. पनवेल विधानसभा निवडणूक जाहीर होताच मोठ्याप्रमाणात गावागावांमध्ये मद्याचा बेकायदेशीर साठा करण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांना खास खबर्‍याकडून तालुक्यातील कसळखंड गावातील एका इसमाकडे देशी विदेशी मद्याचा बेकायदेशीर साठा असल्याची खबर मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सतीश जाधव, सहा. पोलीस निरिक्षक विजय खेडकर, पो.ना. अमोल कांबळे, आर. के. मोकल, सागर रसाळ, संतोष पाटील, चौधरी व पोलीस हवालदार मंगेश महाडिक आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आरोपी पंकज सुधार सिंग (वय 22) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेला हजारो रुपये किमतीचा बेकायदेशीर देशी-विदेशी मद्यसाठा हस्तगत केला.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply