Breaking News

भाजप कार्यकर्त्यांना बळ

नागोठणे जि.प. गटांतर्गत नियुक्तिपत्रे

नागोठणे : प्रतिनिधी

भाजपच्या वतीने नागोठणे जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, शक्तिकेंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष, बूथ समितीतील सदस्य यांची आढावा बैठक येथील शिवगणेश सभागृहात नुकतीच झाली. या बैठकीत युवा नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते नव्याने नियुक्ती केलेल्या पदाधिकार्‍यांना नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. भाजपचे शेखर गोळे यांची रोहे तालुका उपाध्यक्षपदी, अनिल पवार यांची नागोठणे जिल्हा परिषद गट अध्यक्षपदी, राजेंद्र लवटे यांची  नागोठणे पंचायत समिती अध्यक्षपदी, संतोष लाड यांची ऐनघर पंचायत समिती गण अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तसेच शहर महिला मोर्चा कार्यकारिणीवर नैमा काझी, हशमत इलामी, अफ्ताब अत्तार, शगुफ्ता टोलकर, तब्बसुम सरखोत यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्या सर्वांना या वेळी वैकुंठ पाटील यांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देऊन  शुभेच्छा देण्यात आल्या. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे, रोहे तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, उपाध्यक्ष प्रकाश मोरे, सरचिटणीस आनंद लाड, तालुका अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष रऊफ कडवेकर, रोहा तालुका महिला मोर्चा उपाध्यक्षा फातीमा सय्यद, मंजुमा बहारून, विभागीय सरचिटणीस विठोबा माळी, शहर अध्यक्ष सचिन मोदी, तसेच खंडू ठाकूर, सिराज पानसरे, रामचंद्र देवरे, परशुराम तेलंगे, नारायण सुटे, मनोज धात्रक, नीलेश घाग, गौतम जैन, श्रीकांत पाटील, शैनाज कडवेकर, तबस्सुम कडवेकर, शगुफ्ता कोरतकर, नसरीन कडवेकर, शहिदा सय्यद, मेहबुबा शेख, मुमताज शेख यांच्यासह विभागातील पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते.

नवनीत डोलकर तालुका चिटणीस

रोहे : प्रतिनिधी 

तालुक्यातील डॅशिंग नेते नवनीत डोलकर यांची रोहा तालुका भाजप चिटणीसपदी, तर निडी तर्फे अष्टमीचे माजी उपसरपंच उत्तम सीताराम नाईक यांची तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्या हस्ते पेण येथे नियुक्तिपत्रे देण्यात आली. भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी काम करणार असल्याचे नवनीत डोलकर व उत्तम नाईक यांनी सांगितले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply