

कर्जत : बातमीदार
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील गंगानगर भागात राहणारे चंद्रकांत बोंबे यांची इनोव्हा (एमएच-03, एडब्लू-1315) गाडी मंगळवारी (दि. 24) रात्री अज्ञात लोकांनी जाळून टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंद्रकांत बोंबे यांनी त्यांची इनोव्हा गाडी नेहमीप्रमाणे इमारतीच्या खाली उभी केली होती. या गाडीला आग लागल्याचे आजूबाजूच्या रहिवाशांना दिसल्याने त्यांनी आरडाओरड केली. बोंबे घरातून खाली येईपर्यंत गाडी जळून खाक झाली होती.