Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात यशस्वीपणे स्वच्छता अभियान राबविल्याबद्दल बिल अ‍ॅण्ड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या वतीने त्यांना प्रतिष्ठेचा ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. फाऊंडेशनचे चेअरमन बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार प्रदान केला. पंतप्रधानांनी हा पुरस्कार देशवासीयांना समर्पित केला आहे.

गौरवाला उत्तर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वच्छता अभियानाचा भारतातील गरीब तसेच महिलांना सर्वाधिक लाभ झाला आहे. सद्यस्थितीत जगात कोणत्याही देशात असे अभियान पाहायला मिळाले नाही. देशात 2022पर्यंत प्लास्टिकमुक्ती अभियान चालवणार असल्याची माहितीही मोदींनी या वेळी दिली.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply