रोहे : प्रतिनिधी
पुगाव केंद्रस्तरीय क्रीडा महोत्सव 2019 राजिप शाळा चिल्हे येथे दि. 28 फेब्रु. व 01 मार्च रोजी सकाळी 7 ते सायं 6 या दरम्यान झाला. पुगाव, खांब, नडवली, तळवली तर्फे अष्टमी चिल्हे, धानकान्हे, धानकान्हे आदिवासी वाडी, वैजनाथ, डोलवहाळ, मढाली बुद्रुक, नडवली आदिवासी वाडी (शाळा) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळ 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या केंद्रातील सर्व प्राथमिक शाळा व व्यवस्थापन समिती व केंद्रीय सल्लागार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी साधुराम बांगारे, धनवी येलकर, प्रमोद चवरकर, रत्नाकर कनोजे, अनिल पाटील, तळवली तर्फे अष्टमी ग्रामपंचायत सरपंच निकिता शिंदे, उपसरपंच मानसी लोखंडे, देवकान्हे ग्रामपंचायत उपसरपंच सूरज कचरे, चिल्हे गाव कमिटी अध्यक्ष वासुदेव महाडिक, पोलीस पाटील गणेश महाडिक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रुती वाजे, सदस्य रिया लोखंडे, डॉ. श्याम लोखंडे, सदस्य ग्रामस्त महिला मंडळ, पुगाव केंद्रातील विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात दोन दिवसांमध्ये विविध खेळ घेण्यात आले. उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या क्रीडा स्पर्धेत सर्वत्कृष्ट खेळ मुले मढाली बुद्रुक, सर्वोत्कृष्ट खेळ मुली वैजनाथ, मुले व मुली कबड्डी, लंगडी, रस्सीखेच उंच, उडी लांब, उडी, शटल रन, रिले, गोळा फेक, 100 मी धावणे यामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन भरघोस बक्षीस पटकावले.
कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी चिल्हे शाळेचे मुख्याध्यापक मदन गिर्हे, शरद पवार, निवास थळे, ब्रिजेश भादेकर, नीलकंठ कदम, लता भोईर, बाळाजी राठोड, निकिता धुपकर, प्रसाद साळवी, मीनल बावलेकर, सिद्धार्थ मुजमुले, राहुल गोर्डे, जयेंद्र डोलकर, घनश्याम अनुभुले, सपना थळे, सायली पाटील, गीता राठोड, रवींद्र लांडगे, नागनाथ भिंगोले, स्वाती फाटे आदींनी परिश्रम घेतले.