Breaking News

टीम इंडियाने केला अभिनंदनला अनोखा सलाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान शुक्रवारी भारतात परतले. अभिनंदन यांच्या स्वागतासाठी संपूर्ण देश उत्सुक होता. त्यांच्या स्वागतासाठी अनेकांनी वाघा बॉर्डरवर मोठी गर्दी केली होती. भारताच्या या वीरपुत्राने केलेल्या धडाकेबाज कामगिरीसाठी संपूर्ण देशात त्यांना सलामी दिली जात आहे. भारतीय क्रिकेट टीमनेनही आपल्या या शूरवीरला अनोखी सलामी दिली आहे. भारतीय क्रिकेट टीमने आपल्या जर्सीवर विंग कमांडर अभिनंदन असं लिहून त्याखाली नंबर वन दिला आहे.

शुक्रवारी भारतीय क्रिकेट टीमने नवीन जर्सी लॉन्च केली. वर्ल्ड कप 2019 मध्ये टीम इंडिया हीच जर्सी घालून मैदानात उतरणार आहे. काल अभिनंदन भारतात परतल्यानंतर भारतीय टीमने अभिनंदन यांच्या नावाची जर्सी लॉन्च केली. या जर्सीला एक नंबर देऊन तो अभिनंदन यांना सन्मानित करण्यात आला आहे.

भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीनेही अभिनंदन यांच्या भारतात परतण्याने आनंद व्यक्त केला आहे. विराटने शुक्रवारी रात्री 1 फोटो शेअर करत, तुम्ही खरे हीरो आहात. तुम्हाला सलाम असे म्हणत विराटने ट्विट केले आहे. विराट कोहलीसह रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, वीरेंद्र सेहवाग यांनीही अभिनंदन यांना सलाम केला आहे.

14 फेब्रुवारीच्या पुलवामा हल्ल्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या टी-20 सीरीज दरम्यान भारतीय टीमकडून शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली होती. भारतीय टीमने हातावर काळ्या पट्ट्या बांधून हा सामना खेळत हल्ल्याचा निषेध केला होता.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply