Breaking News

मोरबे, कानपोली येथे शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता विविध पक्षांतील पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्याअंतर्गत पनवेल तालुक्यातील मोरबे आणि कानपोली येथील शेकापच्या अनेक कार्यकर्त्यांनी बुधवारी जाहीर पक्षप्रवेश केला. प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले.पनवेल येथील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी बुधवारी झालेल्या या पक्षप्रवेशाच्या वेळी मोरबे येथील शेकापचे संजय पाटील, देवू पाटील, विजय पाटील, दशरथ वाघे, गुरुनाथ वाघे, रमेश वाघे, सुरेश वाघे, शंकर वाघे, अरुण वाघे, तसेच कानपोली येथील अरुण पाटील, जयवंत जोशी, रूपेश पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप नेते नारायण भगत, परशुराम नावडेकर, जनार्दन भगत, बाळाराम उसाटकर, रमेश नावडेकर, रवी पाटील, शाम पाटील, कैलास पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

कॉमनवेल्थ सुवर्णपदक विजेती स्वस्तिका घोषचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्तकॉमनवेल्थ स्पर्धेतील टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका …

Leave a Reply