पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवरात्र मित्र मंडळ व कमळ महिला मंडळ भंगारपाडा यांच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त हळदीकुंकू समारंभाचे गुरुवारी (दि. 3) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रसिद्ध सिनेअभिनेत्री वर्षा उसगावकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या वेळी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, पंचायत समिती सदस्या रेखा म्हात्रे, वडघर विभाग पंचायत समिती युवा अध्यक्ष मच्छिंद्र कटेकर, समीर कटेकर, सचिन कटेकर, निखिल कटेकर, प्रकाश कटेकर, संजय कटेकर, सतीश कटेकर, संदीप कटेकर, नितेश कटेकर, नीलेश गोसावी, सुयोग कटेकर, भास्कर दमडे अमोल गव्हाणकर, वैभव कटेकर, सागर कटेकर, स्वप्नील गोसावी, सुरेश पाटील, नामदेव दमडे, अंकुश कटेकर, बंटी जोशी, निशांत कटेकर, महिला मंडळ अध्यक्षा सुनीता कटेकर, उपाध्यक्षा समता दमडे, खजिनदार सुषमा कटेकर, सचिव संतोषी कटेकर, वनीता कटेकर, ललिता कटेकर, द्रौपदी कटेकर, सारिका कटेकर, आरती कटेकर, स्वप्नाली कटेकर, सुप्रिया कटेकर, गीता कटेकर, कल्पना म्हात्रे यांच्यासह मान्यवर
उपस्थित होते.